नवरात्रीच्या गर्दीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ? माळावरच्या देवीवरील आकाशी पाळण्यांवर कारवाई कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळत लाखो रुपयांची कमाई होत असताना प्रशासन गप्प का?..!! बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’ वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!! “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” मेडदमध्ये विकासाऐवजी ट्रोलिंगवरून नागरिकांचा संताप विरोधकांना उत्तर हे ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते.!! मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!! अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नियुक्तीपत्रे देत तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा; टोळीतील आरोपी जेरबंद_बारामती दि.२६ शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता.बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने ‘गट-क अधिपरिचारिका’ पदावर शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतरांची ओळख करून घेतली. त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रेही दिली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये मार्च २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सुरज तिमयया असदकर हा चिंचवडगाव येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.यापूर्वी अजिंक्य पाठक राहणार दौंड आणि सुधाकर सोळंकी राहणार येरवडा यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने जितेंद्र शिंदे विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’