नवरात्रीच्या गर्दीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ? माळावरच्या देवीवरील आकाशी पाळण्यांवर कारवाई कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळत लाखो रुपयांची कमाई होत असताना प्रशासन गप्प का?..!! बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’ वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!! “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” मेडदमध्ये विकासाऐवजी ट्रोलिंगवरून नागरिकांचा संताप विरोधकांना उत्तर हे ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते.!! मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!! अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!!

डॉ. सौरभ मुथा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; दिखाव्यापेक्षा माणुसकीला प्राधान्य देत मित्र मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

बारामती : वाढदिवस म्हटला की केक, फटाके, हार-तुरे आणि दिखावा एवढ्यापुरतेच अनेकांचे सामाजिक भान मर्यादित राहते. मात्र, वाढदिवसाला माणुसकीची जोड देत एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम कसे करावे, याचा आदर्शच विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाने घालून दिला आहे.डॉ. सौरभ मुथा यांचा वाढदिवस विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ जाणीव, आपुलकी आणि माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यासोबतच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रेरणादायी छायाचित्र देण्यात आले. तसेच कुकर व जर्किंग कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या अनपेक्षित प्रेमाने डॉ. मुथा सरांचे कुटुंबीय अक्षरशः भावुक झाले. मंडळाच्या सदस्यांचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.“असे निस्वार्थ प्रेम करणारे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता आपुलकी जपणारे लोक आज फार कमी आहेत,” अशा भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.

बारामतीत डॉ. सौरभ मुथा यांची फॅमिली लाखात एक!

डॉ.मुथा सरांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कार्याशी असलेले आपुलकीचे नाते या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. माणसाला माणूस म्हणून सन्मान देणे, सुख-दुःखात धावून जाणे आणि समाजातील नाती जपणे हीच खरी श्रीमंती आहे, हे या उपक्रमातून दिसून आले.विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा उद्देश केवळ कार्यक्रम घेणे नाही, तर “माणुसकी जिवंत ठेवणे आणि माणसांमधील माणूस जिवंत ठेवणे” हा आहे. समाजात वाढत चाललेल्या दिखाव्याच्या संस्कृतीला फाटा देत, निस्वार्थपणे सामाजिक आणि भावनिक नाती जपण्याचे काम हे मंडळ सातत्याने करत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्नया कार्यक्रमाला उपकारदाता व दिव्य पुरुष अॅड. सुधीरजी पाटसकर साहेब, अन्नदाता व सभापती सत्यव्रत अर्जुनराव काळे, पत्रकार तैनुरभाई शेख, अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे, अमित भैय्या बगाडे, सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रशांत मामा कुचेकर, पवनराजे बनसोडे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले (फौजी), नरेंद्र भाऊ मिसाळ, मेंबर विठ्ठल शेठ आगवणे, ओंकार शेठ राऊत, चेतन शेठ वाडेकर, विनोद भैय्या हिंगमिरे तसेच विष्णुपंत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज समाजाला केवळ मोठमोठ्या घोषणा देणाऱ्यांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून माणुसकी दाखवणाऱ्या हातांची गरज आहे.वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी वापरता येते, हे विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

“माणुसकीची जाहिरात करायची नसते; ती कृतीतून दाखवायची असते!”

विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा हा उपक्रम म्हणजे केवळ एका वाढदिवसाचा कार्यक्रम नसून, बारामतीच्या सामाजिक जीवनात माणुसकीचा जागर करणारा आणि नाती जपण्याचा संदेश देणारा उपक्रम ठरला आहे.

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’