नवरात्रीच्या गर्दीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ? माळावरच्या देवीवरील आकाशी पाळण्यांवर कारवाई कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळत लाखो रुपयांची कमाई होत असताना प्रशासन गप्प का?..!! बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’ वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!! “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” मेडदमध्ये विकासाऐवजी ट्रोलिंगवरून नागरिकांचा संताप विरोधकांना उत्तर हे ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते.!! मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!! अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

‘माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत… लवकर या’११२ वर मदतीचा कॉल अन् अवघ्या काही मिनिटात तलवार व चाकूसह आरोपी जेरबंद..

शिक्रापूर, दि.७ ‘माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत… लवकर या’ डायल ११२ वर आलेल्या या आर्त कॉलने शिक्रापूर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हातात तलवार आणि खिशात धारदार चाकू घेऊन पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेत संभाव्य रक्तरंजित घटना रोखली.

ही बाब पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गांभीर्याने घेतली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सुनील यशवंत शेंडगे हे ६ जुलैच्या रात्री डायल ११२ कर्तव्यावर होते. मंगळवारी सकाळी १०.१६ वाजण्याच्या सुमारास साहिल खराबे याचा मदतीचा कॉल प्राप्त झाला. कॉलमध्ये वडील तलवार घेऊन आई आणि मुलाच्या जीवावर उठल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शेंडगे यांनी वरिष्ठांना कळवून पोलीस कॉन्स्टेबल साळवे यांच्यासह तातडीने धानोरे (ता.शिरूर) येथे धाव घेतली.

अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिले असता बाबासाहेब नामदेव खराबे (वय ४३) हा पत्नी व मुलाला शिवीगाळ, दमदाटी करत हातातील तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावत होता. क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. झडतीदरम्यान त्याच्या पँटच्या खिशातून धारदार चाकूही जप्त करण्यात आला. आरोपीकडून सुमारे ३० इंच लांबीची तलवार आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील शेंडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अन्वये शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव अधिकारी शिवाजी भोसले हनुमंत गिरी पोलीस अंमलदार सुनील शेंडगे नितीन साळवे उद्धव भालेराव प्रशांत गायकवाड बापू हदगले रोहिदास पारखे मयूर कुंभार यांनी केली आहे.

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’