
करंजेपूलच्या सभेतील एका दृश्याने काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; आकाश मोरे सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रश्नचिन्ह.
बारामती:- करंजेपूल येथे ९ ऑक्टोबर रोजी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेने बारामतीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पॅनेलच्या या सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मात्र या सभेतील एका दृश्याची राजकीय चर्चा अधिक रंगू लागली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार राहिलेले आकाश मोरे हे सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे व्यासपीठावर बसलेले दिसून आल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, २०२६च्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती; मात्र नंतर काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली. त्या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माघारीबाबत माहिती दिली होती.आता त्याच आकाश मोरेंची अजित पवार गटाच्या सोमेश्वर कारखाना प्रचारसभेतील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. ही केवळ वैयक्तिक उपस्थिती होती की त्यामागे काही राजकीय संदेश आहे?
आता आकाश मोरे हे अजित पवार गटाच्या व्यासपीठावर दिसल्याने त्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.काही राजकीय चर्चांमध्ये उमेदवारी माघारीबाबत वेगवेगळे तर्क मांडले जात असले, तरी आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप सिद्ध झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर नसल्याने ते तथ्य म्हणून मांडता येणार नाहीत. त्यामुळे या चर्चांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि स्वतः आकाश मोरे काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा थेट सवाल — ‘पक्षाची भूमिका काय?’काँग्रेस पक्षाची भूमिका, उमेदवारी माघारीचा निर्णय आणि त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची विरोधी राजकीय व्यासपीठावरील उपस्थिती या तिन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.आकाश मोरे यांची करंजेपूलच्या सभेतील उपस्थिती नेमकी कोणत्या कारणासाठी होती?
काँग्रेस नेतृत्वाला याची पूर्वकल्पना होती का?उमेदवारी माघारीचा निर्णय आणि सध्याची राजकीय जवळीक यांचा काही संबंध आहे का?या प्रश्नांची उत्तरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे यांनी स्पष्टपणे द्यावीत, अशी मागणी होत आहे.
बारामतीच्या राजकारणात सध्या एकच चर्चा —‘स्टेजवरची खुर्ची साधी होती की त्यामागे काही मोठे राजकीय समीकरण?’








