नवरात्रीच्या गर्दीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ? माळावरच्या देवीवरील आकाशी पाळण्यांवर कारवाई कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळत लाखो रुपयांची कमाई होत असताना प्रशासन गप्प का?..!! बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’ वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!! “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” मेडदमध्ये विकासाऐवजी ट्रोलिंगवरून नागरिकांचा संताप विरोधकांना उत्तर हे ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते.!! मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!! अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!!

अर्जुन नाना यादव यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती; सरपंच सोनाली नेवसे व पॅनल सदस्यांची प्रत्यक्ष पाहणी.

मेडद :- गावचा विकास केवळ आश्वासनांमध्ये न राहता तो प्रत्यक्ष रस्त्यावर दिसला पाहिजे, या भूमिकेतून अर्जुन नाना यादव यांच्या नेतृत्वाखाली मेडद गावात विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जात-पात, धर्म आणि गट-तटाच्या राजकारणापलीकडे जाऊन काम आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून अर्जुन नाना यादव यांची भूमिका ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना रस्त्यांमुळे त्रास होऊ नये, यासाठी गावातील विविध गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुरमीकरण व रस्त्यांचे अस्तरीकरण करण्यात येत आहे.रस्त्यांची आवश्यक उंची वाढवून मुरूम टाकणे, त्याचे व्यवस्थित मुरमीकरण करणे, रोलिंग करणे आणि त्यानंतर पाणी मारून रस्ते मजबूत करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

एकहाती नेतृत्वातून विकासाची दिशामेडद गावात एकहाती नेतृत्व आणि ठोस निर्णयक्षमता असेल, तर गावाचा विकास कोणत्या पद्धतीने घडू शकतो, याचे उदाहरण सध्या सुरू असलेल्या कामांमधून दिसून येत असल्याचे अर्जुन नाना यादव यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

अर्जुन नाना यादव यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सोनाली नेवसे आणि पॅनलमधील सर्व सदस्य गावातील विविध भागांत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करत असून, नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यावर भर दिला जात आहे.

गावातील प्रत्येक गल्लीबोळात विकासकामे पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे ‘मेडद गावात गल्लीबोळात मुरमीकरणाचा पाऊस’ असे चित्र निर्माण झाले आहे

गावाच्या विकासासाठी सत्ता आणि नेतृत्वाचा उपयोग कसा करता येतो, याचे उदाहरण म्हणून सध्याच्या विकासकामांकडे पाहिले जात आहे. “विकास हा कोणत्याही जात-पात किंवा धर्माच्या चौकटीत नसतो; विकास हा प्रत्येक ग्रामस्थाचा अधिकार आहे,”

या विचारातून काम करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

ग्रामपंचायत सदस्य पप्पू गाढवे यांचेही मोलाचे योगदान

या मुरमीकरण व रस्ते अस्तरीकरणाच्या कामांमध्ये ग्रामपंचायत सदस्य पप्पू गाढवे यांनी मोलाचे योगदान दिल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. कामाच्या अंमलबजावणीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ग्रामस्थांकडून आभार मेडद गावातील सुरू असलेल्या विकासकामांबद्दल अर्जुन नाना यादव, सरपंच सोनाली नेवसे, पॅनलमधील सर्व सदस्य तसेच पप्पू गाढवे यांचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

“नेतृत्वाची खरी ओळख ही पदावरून नव्हे, तर गावासाठी केलेल्या कामातून होते. मेडदच्या गल्लीबोळात सुरू असलेली विकासकामे ही त्याचीच प्रचिती देत आहेत’’

अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.मेडदच्या विकासाची दिशा स्पष्ट आहे —राजकारणापेक्षा विकास, आश्वासनांपेक्षा काम आणि घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती!

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’