नवरात्रीच्या गर्दीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ? माळावरच्या देवीवरील आकाशी पाळण्यांवर कारवाई कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळत लाखो रुपयांची कमाई होत असताना प्रशासन गप्प का?..!! बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’ वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!! “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” मेडदमध्ये विकासाऐवजी ट्रोलिंगवरून नागरिकांचा संताप विरोधकांना उत्तर हे ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते.!! मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!! अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

‘त्या’ अजगराचा बंदोबस्त करण्यासाठी लोणारी समाज जेजुरीत एकवटणार! आमदार रवींद्र धंगेकरांचे एल्गार; पै सार्थक फाउंडेशनची जोरदार तयारी..

लोणारी समाज बारामती व पैलवान सार्थक फाउंडेशन.

जेजुरी:-“नरळे मातोश्रींनी लोणारी समाजासाठी दिलेली २३ एकर हक्काची जागा बळकावण्यासाठी एक ‘अजगर’ टपून बसला आहे. या अजगराचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे. समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि हक्कासाठी २५ जून २०२६, गुरुवार रोजी महाराष्ट्रातील तमाम लोणारी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने जेजुरी गड नगरीत दाखल व्हावे,” असे थेट आवाहन कसबा मतदारसंघाचे डॅशिंग आमदार रविंद्र भाऊ धंगेकर यांनी केले आहे. या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजात अन्यायाविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हक्काच्या जमिनीवर कुणाची वक्रदृष्टी?

लोणारी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी नरळे मातोश्रींनी २३ एकर मोलाची जागा दान दिली होती. मात्र, काही भूमाफिया आणि स्वार्थी घटकांची वक्रदृष्टी या मोक्याच्या जमिनीवर पडली आहे. ही हक्काची जागा हडप करण्याचा डाव आखला जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार धंगेकर यांनी केला आहे. समाजाच्या हक्कावर दरोडा टाकणाऱ्या या ‘अजगराचा’ कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

पैलवान सार्थक फाउंडेशनकडून आंदोलनाची जय्यत तयारी! आमदार रवींद्र धंगेकर यांच्या या एल्गाराला गती देण्यासाठी पैलवान सार्थक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै गणेश दत्तात्रय आटपडकर यांनी कंबर कसली आहे. या विराट मोर्चाचे नियोजन करण्यासाठी आणि समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी आटपडकर यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गावोगावी बैठका घेऊन आणि संपर्क अभियान राबवून या मोर्चाची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे. “समाजाच्या हक्काच्या जागेवर डोळा ठेवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे. हा लढा आरपारचा असून, २५ जूनला जेजुरीत होणारा जनसागर विरोधकांचे डोळे पांढरे करेल.

“पै गणेश दत्तात्रेय आटपडकर(संस्थापक अध्यक्ष, पैलवान सार्थक फाउंडेशन) आज २५ जूनला जेजुरीत होणार ऐतिहासिक जनक्षोभ!

आज २५ जून, गुरुवार रोजी जेजुरी येथे होणाऱ्या या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून लोणारी समाज बांधव, तरुण आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आपल्या हक्काच्या २३ एकर जमिनीचे रक्षण करण्यासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.**आता माघार नाही!** समाजाच्या संपत्तीवर डल्ला मारू पाहणाऱ्या प्रवृत्तींना जेजुरीच्या भूमीत कडक इशारा देण्यासाठी समाज सज्ज झाला असून, प्रशासनाचे आणि राजकीय वर्तुळाचे या आंदोलनाकडे बारीक लक्ष लागून राहिले आहे.

पै.गणेश दत्तात्रेय आटपडकर. डॉ.अक्षय नवनाथ करचे. तुषार आटपडकर . तात्यासाहेब राणे. सुनील आटपाडकर. अमोल कुलट. अमित करचे. प्रकाश करचे. अवधूत करचे. व पैलवान सार्थक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’