नवरात्रीच्या गर्दीत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ? माळावरच्या देवीवरील आकाशी पाळण्यांवर कारवाई कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळत लाखो रुपयांची कमाई होत असताना प्रशासन गप्प का?..!! बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’ वाढदिवसाच्या निमित्ताने माणुसकीचा जागर; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाची वेगळी ओळख..!! “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” मेडदमध्ये विकासाऐवजी ट्रोलिंगवरून नागरिकांचा संताप विरोधकांना उत्तर हे ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते.!! मेडद गावात विकासकामांचा धडाका; गल्लीबोळात मुरमीकरणाचा ‘पाऊस’गावच्या विकासाचे नेतृत्व असावे तर अर्जुन नाना यादव यांच्यासारखे!! अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई..

‘वसुली’ की पोलीस कारवाई? बारामतीकरांनो, नक्की चाललंय काय?ही दंडात्मक कारवाई आहे की उघड-उघड लाचखोरी?

बारामती:- एकीकडे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवैध धंद्यांवर धडक कारवाया करत सिंघम स्टाईलने मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच हाताखालील काही पोलीस कर्मचारी खाकी वर्दीला ‘वसुलीचं’ साधन बनवत आहेत!

नेमकं घडलं काय?

पाटस रोडवरील कॅनॉलवर दोन तरुण बिअर पीत बसले होते. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे, यात वाद नाही. तिथे दोन पोलीस कर्मचारी पोहोचतात. गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली जाते आणि ‘सेटलबाय’साठी थेट ५,००० रुपयांची मागणी केली जाते!

शेवटी घासाघीस होऊन १,५०० रुपये खिशात टाकले जातात आणि त्या तरुणांना सोडून दिले जाते.

सवाल हा आहे की, ही दंडात्मक कारवाई आहे की उघड-उघड लाचखोरी?

…तर कायदा फक्त खिशातले पैसे बघून बदलतो का?जर त्या तरुणांनी गुन्हा केला होता, तर त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करून पावती फाडायला हवी होती. पण इथे कारवाईच्या नावाखाली स्वतःचे खिसे गरम केले गेले.

पोलीस निरीक्षकांच्या मेहनतीला सुरुंग:

एकीकडे पोलीस स्टेशनचे प्रमुख शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत, तर दुसरीकडे हे असे ‘वसुली बहाद्दर’ पोलीस कर्मचारी खाकी वर्दीची अब्रू चव्हाट्यावर आणत आहेत.हा कोणता न्याय? पैसे दिले की गुन्हा माफ? मग सामान्य जनतेने कायद्याचा आदर करायचा की पोलिसांच्या वसुलीला घाबरायचा?

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, पण त्या कारवाईच्या नावाखाली पोलिसांच्या नावावर ‘हप्ता’ आणि ‘लाच’ घेणाऱ्या अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?

लवकरच पुराव्यासह सविस्तर बातमी.

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

बारामती विधानसभेत माघार घेतलेले काँग्रेसचा उमेदवार, महायुतीच्या व्यासपीठावर! आकाश मोरेंच्या उपस्थितीने बारामतीत नवा राजकीय ‘सस्पेन्स’; हर्षवर्धन सपकाळांसमोर थेट सवाल. ‘माघारीमागचं गणित नेमकं काय?’